Shiv Sena Mla Disqualification Decision : खरी शिवसेना कुणाची? अखेर फैसला झालाच
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अखेर अंतिम निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याचे म्हणत राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकालाची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई, १० जानेवारी २०२४ : गेल्या काही महिन्यांपासून ज्या निकालाची प्रतिक्षा होती तो निकाल लागला. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अखेर अंतिम निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे बहुमत असल्याचे म्हणत राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकालाची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र मान्य केलेले नाहीत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र मान्य धरण्यात आलं नाही. तसेच राहुल नार्वेकर यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घटना दुरुस्ती मान्य केली. उद्धव ठाकरे यांनी 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती, असं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाची पुन्हा कायदेशीर लढाई सुरु होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.