आले रे आले, गद्दार आले; पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत घोषणाबाजी, कुणी केली नारेबाजी?
VIDEO | कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची रॅली; रॅलीत मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून सायंकाळी 6 वाजेनंतर कुठलाही प्रचार करता येणार नाहीये. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या उमेदवारासाठी रोड शो तर काँग्रेस दिग्गज नेतेही आज रोड शो करत आहे. ठिकठिकाणी सभा देखील कॉंग्रेसकडून आयोजित करण्यात आल्या आहे. अशातच पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा पाहायला मिळाल्यात. तर घोषणा देणारा व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कसबा पेठ मतदार संघात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली आहे. यावेळी रॅलीत मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मात्र घोषणा देणारा व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी अद्याप त्याची अधिक माहिती समोर आलेली नाही.