‘तेव्हा फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी…’, एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

| Updated on: Dec 04, 2024 | 4:56 PM

भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

महायुतीच्या नेत्यांनी राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांना तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार आहात का? असा सवाल करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, अरे बाबा, तुम्हाला संध्याकाळी सांगतो ते. तुम्हाला तर एकदमच पाहिजे सगळं. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. पुढे ते असेही म्हणाले, “आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. राज्यपालांनी परवानगी दिली. उद्या साडेपाच वाजता आझाद मैदानात शपथविधी आहे. देवेंद्रजींनी निमंत्रण दिलं. आम्हीही देतो. अडीच वर्षापूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफरस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि समर्थनाचं पत्र दिलं आहे”, असं म्हणत त्यांनी किस्सा सांगितला.

Published on: Dec 04, 2024 04:56 PM