एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार; नवा रोल काय?

| Updated on: Nov 26, 2024 | 11:54 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राज्यात महायुतीतील कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महायुतीच्या नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान राजभवन दाखल झालेत. त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान, नवा मुख्यमंत्री कोण हे समोर येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

Published on: Nov 26, 2024 11:54 AM
Eknath Shinde : सत्तास्थापनेपूर्वी एकनाथ शिंदेंचं मोठं ट्विट, ‘शिवसैनिकांनी माझ्या समर्थनार्थ एकत्र येऊ नये आणि…’
Rashmi Shukla : निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती