एकनाथ शिंदे लटके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी
आमदार रमेश लटके यांचा अंत्यविधी मुंबईत पार पडला यावेळी अनेक नेते उपस्थित होते. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली लटके कुटुंबियांचं सांत्वन केलं.
मुंबई : अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. आमदार रमेश लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचा अंत्यविधी मुंबईत पार पडला यावेळी अनेक नेते उपस्थित होते. शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली लटके कुटुंबियांचं सांत्वन केलं.
Published on: May 13, 2022 05:11 PM