शिंदे गटाच्या अंधेरी विभागप्रमुखानं स्वतः सांगितलं अज्ञाताकडून कसा झाला हल्ला, ‘फोडल्या गाडीच्या काचा अन्…’
VIDEO | शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभागप्रमुखांवर जीवघेणा हल्ला, मुंबईत नेमकी कुठं घडली घटना? विभागप्रमुखानं स्वतः दिली माहिती
मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री साडे ११ वाजता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती स्वतः अंधेरी विभागाचे प्रमुख अल्ताफ पेवकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘वर्सोवा येथील एक कार्यक्रम संपवून घरी परतत असताना आपल्या कारने जात असताना हल्लेखोर आपले तोंड झाकलेल्या अवस्थेत होते आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या गाडीची काच फोडली अन् काहीशी मारहाण केली’. तर आज माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे, ते कोण आहेत याचा तपास वर्सोवा पोलीस करत आहेत, हल्लेखोरांना हल्ला करून त्यांना काय साध्य करायचं होतं. याच्या मागे राजकीय रंग दिसत आहे. पोलीस आता तो शोध घेतील. माझ्या गाडीवरती हल्ला केला आहे सुदैवाने मला काही लागलं नाही थोडं मुक्कामार लागलाय. माझी स्टेटमेंट घेतलेले आहे पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात कोणावरती अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले.