Shahaji Bapu Patil : ‘… तर राजकीय संन्यास घेईल’, शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 28, 2024 | 3:47 PM

निवडणुकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, शहाजी बापू पाटील यांनी जाहीरपणे मोठं विधान केले आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील जनतेला शब्द दिला आहे. निवडणुकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, शहाजी बापू पाटील यांनी जाहीरपणे मोठं विधान केले आहे. सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजहन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. त्याच्यासमोर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती. दोन वर्षात ५ हजार कोटीचा विकास निधी एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहिती आहे, असे म्हणत दिपक आबा यांच्यासह देशमुख यांना शहाजी बापू पाटलांनी खडेबोल सुनावले आहे. तर मी सुडाचे राजकारण केले नाही करत नाही. शहजीबापू निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असं पद घेऊन येतो, पुढील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत गुलाल घेऊनच येणार, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलाय.

Published on: Nov 28, 2024 03:47 PM
Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, ‘मला पाडण्याची त्यांची…’
Chhagan Bhujbal : ‘… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय’, नाव न घेता छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा