‘संजय राऊत मेंटल, पागल… त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा…’, शिंदेंच्या नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Nov 30, 2024 | 3:55 PM

संजय राऊत हे मेंटल झाले आहेत, ते स्वतः संपणार आहेत', असंही म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. बघा काय केली गुलाबराव पाटील यांनी जिव्हारी लागणारी टीका?

‘संजय राऊत यांना रूग्णालयात दाखल करावं लागेल, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. संजय राऊत हे मेंटल झाले आहेत, ते स्वतः संपणार आहेत’, असंही म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीसह शिवसेना या दोन राजकीय पक्षात उभी फूट पडली. या पक्षात उभी फूट पाडण्यामागे मोठा नेत्याचा हात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बोलताना सर्वात पहिले तर संजय राऊतला अॅडमिट केले पाहिजे. तो मेंटल झाला आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका केली. तर संजय राऊत या माणसाने शिवसेना संपवली. शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरे यांना संपवलं. राहिला सुरला आता तो स्वतः संपणार आहे. त्यामुळे तो मेंटल झाला आहे, पागल झाला आहे. त्याच्या हातात दगड द्या. दगड घे हातात म्हणा आणि फिर म्हणा भिवंडीच्या बाजारात… असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Published on: Nov 30, 2024 03:29 PM
Mahadev Jankar : ‘…म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर’; EVM संदर्भात महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील ‘या’ 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा ईव्हीएमवर संशय अन्…