Gulabrao Patil यांच्या कुणाला कानपिचक्या? म्हणाले, जर मी हरलो तर तुमच्या घराजवळ…

Gulabrao Patil यांच्या कुणाला कानपिचक्या? म्हणाले, जर मी हरलो तर तुमच्या घराजवळ…

| Updated on: Oct 08, 2023 | 11:27 AM

VIDEO | शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आढावा बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जळगाव ग्रामीण मतदार संघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जळगाव, ८ ऑक्टोबर २०२३ | शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याचे पाहायला मिळाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल. पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाची बैठक नुकतीच जळगावात पार पडली. यावेली गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सूचना दिल्यात. जळगाव ग्रामीण मतदार संघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले तर जिल्हा परिषद ,पंचायत समिती सुद्धा ताकदीने लढू असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्यात.

Published on: Oct 08, 2023 11:27 AM
लोकसभेच्या रिंगणात मनसे उतरणार? कोण आहेत मनसेचे 9 उमेदवार? त्यांची होतेय चर्चा
Raj Thackeray थेट म्हणाले, उपोषण वगैरे आपलं काम नाही