Ramdas Kadam : … तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र होणार, रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य
VIDEO | आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशात शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मोठं भाष्य केले आहे. सातत्याने सर्वोच्च न्यायालय हे आता अध्यक्षांना आदेश देत आहे. ही लढाई अंतिम टप्यात आली असल्याने म्हणत रामदास कदम यांनी काय केलं भाष्य?
रत्नागिरी, २१ ऑक्टोबर २०२३ | आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशात शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मोठं भाष्य केले आहे. सातत्याने सर्वोच्च न्यायालय हे आता अध्यक्षांना आदेश देत आहे. ही लढाई अंतिम टप्यात आली आहे. माझे आडनाव काय जोशी नाही की मी ज्योतिषी नाही, मला माहित नाही यावर काय निकाल येईल. मात्र ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास दाखवून त्यांना अपशब्द वापरणं हे अशोभनीय आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतील. तर, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर उद्धव ठाकरे बाजूला जे आमदार आहेत ते पुन्हा न्यायालयात जातील असा माझा अभ्यास आहे असे ते म्हणाले. जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तोच निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर उद्धव ठाकरे यांचे १५ आमदार अपात्र होणार, असल्याचे भाष्य रामदास कदम यांनी केले.