Sanjay Raut : संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक, शिवसेनेच्या नेत्याचा खोचक टोला

| Updated on: Oct 13, 2023 | 9:28 PM

VIDEO | नाशिकचा उडता पंजाब होतोय, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना विचारले असता रामदास कदम यांनी खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत हे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक असल्याचे कदम म्हणाले

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | नाशिकचा उडता पंजाब होतोय, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना विचारले असता रामदास कदम यांनी खोचक टोला लगावला आहे. रामदास कदम कदम यांनी संजय राऊत हे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक असल्याचे म्हणत खोचक हल्लाबोल केलाय. रामदास कदम म्हणाले, ‘संजय राऊत दररोज काही न काही तरी बोलत असतात. खरं सांगायचं तर संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक आहे. संजय राऊत यांना कोणीही गंभीर्याने घेत नाही. मी ही घेत नाही, असा टोला त्यांनी लगावला.’ यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर एक न्यायाधीश म्हणून त्यांना निर्णय घ्यायचे आहे. इतका वेळ लागेल त्याला तितका वेळ द्यायला पाहिजे. छातीवरती चाकू ठेवायचा आणि ताबडतोब न्याय देतोस की नाही बोल, अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धमक्या देण्याची परंपरा नाही. हा बिहार नाही. योग्य वेळेला ते योग्य निर्णय घेतील, असेही रामदास कदम म्हणाले.

Published on: Oct 13, 2023 09:27 PM
आमदार बच्चू कडू यांचे कुणी केले वांधे? म्हणाले, सहा मजले सुधारले तरी अख्खा महाराष्ट्र…’
Chandrakant Patil : पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, … ही एक छोटी तडजोड