Sanjay Shirsat : महाराष्ट्राचा CM कोण? मुख्यमंत्रिपदाचा 2-2-1 फॉर्म्युला ठरला? संजय शिरसाट स्पष्ट म्हणाले…
भाजपचा गटनेता निवडला गेला नाहीय. आमचा आणि एनसीपीचा निवडला गेलाय. याला दोन दिवस अजून लागणार आहेत. यानंतर एकनाथ शिंदे आणि दोन्ही प्रमुख नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार, तिथे मुख्यमंत्री कोण हे ठरणार. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि मुख्यमंत्री कोण या नावाची घोषणा होणार, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळात कुणाला किती जागा द्यायच्या, याच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासोबतच मुख्यमंत्री कोण होणार? ते देखील ठरणार असल्याची चर्चा असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपचा गटनेता निवडला गेला नाहीय. आमचा आणि एनसीपीचा निवडला गेलाय. याला दोन दिवस अजून लागणार आहेत. यानंतर एकनाथ शिंदे आणि दोन्ही प्रमुख नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार, तिथे मुख्यमंत्री कोण हे ठरणार. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल आणि मुख्यमंत्री कोण या नावाची घोषणा होणार, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट असेही म्हणाले, महायुतीचा मुख्यमंत्री कोणीही झालं तरी त्यांचा आम्हाला आनंद आहे. कुणीही मुख्यमंत्री झालं तरी स्वागतच आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस झाले तरी त्याचा आम्ही आनंद साजरा करू. कोणी झाला तरी हा नाराज तो नाराज असे नसते. प्रत्येक पक्षाचे आमदार असतात त्यांची मागणी असते आपला नेता मुख्यमंत्री व्हावं.