Uday Samant : ‘विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदावर बोलू नये, आधी स्वतःचे…’; उदय सामंत यांचा ‘मविआ’वर घणाघात

| Updated on: Nov 26, 2024 | 6:07 PM

'मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालं आहे. महाराष्ट्रातील जनतेने २३० पेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणली आहे'

ज्यांना विरोधीपक्ष नेता बनवता येत नाही, त्यांनी मुख्यमंत्रिपदावर बोलू नये, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. विरोधी पक्षनेता कोण असेल हे पुढच्या ४८ तासात महाविकास आघाडीने सांगावं, असंही उदय सामंत यांनी म्हणत चॅलेंज दिलं आहे. इतकंच नाहीतर विरोधक राहिले कुठे? विरोधक राहिले पाहिजे, असे म्हणत त्यांनी खोचक टीकाही केली आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भातील ज्या शंका महाराष्ट्राच्या मनात होत्या त्याबद्दल स्वतः एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ट्वीट करून यासंदर्भातील शंका दूर केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालं आहे. महाराष्ट्रातील जनतेने २३० पेक्षा जास्त आमदार निवडून देऊन पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणली आहे. महायुतीचे तीनही नेते परिपक्व आहे. ते तिघंही एकत्र बसतील आणि लवकर निर्णय घेतील, असंही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 26, 2024 06:07 PM
Nagraj Manjule : ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत, राऊत यांच्यावर शिरसाट यांचा पलटवार