Gulabrao Patil Video : शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, ‘गुलाबराव पाटील गद्दार… पण जनतेनं ओके काम केलं’
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांच्या टीकेवर बोलताना जाहीरपणे त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी मिश्किलपणे भाष्य करत विरोधकांना टोला लगावला.
वर्षभर गद्दार आणि खोके या वाक्यांनी आम्हाला खूप पिकवलं, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. तर जनतेनं ओके काम केलं आणि ६० हजार मतांनी निवडून दिलं, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गेल्या चार निवडणुकांपेक्षा मला या निवडणुकीचे जास्त टेन्शन होतं कारण या निवडणुकीमध्ये गद्दार चुनके नही आते असं सारखं विरोधक म्हणत होते. मात्र मी त्यावेळी म्हणायचो की आम्ही गद्दार नाही आम्ही उठाव केला आहे. तर दिवार पिक्चरमध्ये जसं डायलॉग आहे मेरा बाप चोर आहे, तसं मला म्हणायचे गुलाबराव पाटील गद्दार आहे. उठाव केल्यानंतर पंढरपूरच्या एका कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी तर हे गद्दार, खोके असं म्हणाले. वर्षभर गद्दार आणि खोके या वाक्यांनी आम्हाला खूप पिकवलं. पण तुम्ही (जनतेने) असं ओके काम केलं. मला छप्पर फाडके ६० हजार मतांनी निवडून दिलं, असं जाहीरपणे गुलाबराव पाटील म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट ठरला आणि मला पुन्हा मंत्रिपद मिळालं. तीन पक्ष आणि त्यातच आपल्या पक्षाचा वाटा कमी त्यामुळे मंत्रीपद मिळेल की नाही असं वाटत होतं मात्र तुमच्या आशीर्वादाने मंत्रिपद मिळालं आणि खातं सुद्धा तेच पानी वाले बाबा…असं मिश्कीलपणे गुलाबराव पाटील म्हणाले.