Aamshya Padavi Taking Oath : शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही? बघा नेमकं काय झालं?

| Updated on: Dec 08, 2024 | 5:49 PM

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी विशेष अधिवेशनात काल आणि आज नव्या आमदारांनी आपल्या आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी शिंदे गट शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांनी देखील आपल्या आमदारकीचं आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र यावेळी आमश्या पाडवी यांना शपथ घेताना एकही शब्द वाचता न आल्याचे पाहायला मिळाले. त्यांना अध्यक्षांनी शपथ वाचून दाखवली त्यानंतर त्यांनी ती एक एक शब्द मागून म्हटली.

कोण आहेत आमश्या पाडवी?

आमश्या पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत आमश्या पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे) ४८०० मतांनी विजय झाला.

Published on: Dec 08, 2024 05:49 PM
Navneet Rane : ‘होऊन जाऊद्या… रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील’, नवनीत राणांचं विरोधकांना थेट आव्हान
शिंदेंच्या सेनेकडून कोणाची वर्णी, ‘या’ 2 नेत्यांना मिळणार डच्चू? अर्थ, गृह, महसूल बडी खाती कोणाकडे?