‘संजय राऊत यांना यानात बसवून चंद्रावर पाठवायला हवं होतं’, कुणी केली खोचक टीका
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार शहाजी बापू पाटील यांची खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका; म्हणाले, 'संजय राऊत यांना चंद्रावर पाठवलं असतं तर राज्याची किरकिर गेली असती'
पंढरपूर, २४ ऑगस्ट २०२३ | हिंदुत्वाचा विचार करून उद्धव ठाकरे साहेब यांनी आता नरेंद्र मोदी साहेब यांच्या सोबत यायला हवे, अशी आमदार पाटील यांची भावनिक साद दिली. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक चूक केली. संजय राऊत यांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं. महाराष्ट्राची किड गेली असती. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये. त्यांची लय आबदा होईल असा सल्ला आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला. उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांविषयी मोठं व्यक्तव्य केलं ते म्हणाले, माझ्या हातात सत्ता होती. आमदारांना डांबून ठेवता आलं असतं, पण माझ्या नितिमत्तेत बसत नाही त्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्याविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले पण उद्धव ठाकरे आम्हाला कुठ डांबायाला निघाले आहेत. तुम्ही स्वतःला डांबून घेतल्यानेच ही वेळ आली आहे; असा टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.