लोकसभेसाठी शिंदे गटाचं ‘मिशन 22’ , ठाकरे गटानं लढलेल्या ‘त्या’ जागांवर दावा करणार
VIDEO | ठाकरे गटानं लढलेल्या 23 पैकी 22 जागांवर शिंदे गटाचा दावा, शिंदे गटाची तयारी सुरू
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता लोकसभेच्या २२ जागांवर दावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटानं लढलेल्या २३ पैकी २२ जागांवर शिंदे गटाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन २२ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीकरता २२ जागांवर आग्रही असल्याचेही सुत्रांकडून माहिती मिळतेय. दरम्यान, एकीकडे संजय राऊत यांनी आमचे संसदेत १९ खासदार किंवा त्याहून अधिक खासदार दिसणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीत १९ जागा कशा काय मागू शकतात? असा सवाल केला आहे. मात्र, दुसरीकडे हाच शिंदे गट भाजपकडे लोकसभेच्या २२ जागांवर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.