राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, पवारांचा ताफा निघाला!

| Updated on: Jun 22, 2022 | 10:27 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना जबरदस्त वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सिल्वर ओकवर रवाना होतायत.

मुंबई: कालपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आज खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले, टीव्ही9 मराठीशी (TV9 marathi) बोलताना त्यांनी माहिती दिलीय कि त्यांच्यासोबत 40 आमदार आहेत. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आणि राजकीय वर्तुळात हालचाली चालू झाल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना जबरदस्त वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सिल्वर ओकवर रवाना होतायत.

Published on: Jun 22, 2022 10:27 AM
Shambhuraj Desai | शंभूराज देसाई यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार
इकडे लक्ष द्या, घटनाकार उल्हास बापट कायदा उलगडून सांगतायत, काय शक्यता आहेत बघा…