आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांचं शक्तिप्रदर्शन, आमदारांची घोषणाबाजी
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढतेय. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दुपारी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केलं.