मुख्यमंत्री भाजपचाच होणार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला अन् म्हणाले…

| Updated on: Nov 28, 2024 | 11:01 AM

कनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावरून पाठिंबा दिलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील.

विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेवरून हालचाली थांबल्या होत्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून जो मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मोदी-शाह घोषित करतील त्याला पाठिंबा असेल, अशी घोषणा करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदावरून पाठिंबा दिलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील. दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेची कोणतीही आडकाठी नाही किंवा माझी कोणतीही अडचण नाही. हे स्पष्ट केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची फक्त औपचारिकता बाकी आहे. तर शिंदेंच्या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानत अभिनंदन केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 28, 2024 11:01 AM
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
‘कॉमन मॅन’ एकनाथ शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? उपमुख्यमंत्री होणार की पक्षाची धुरा सांभाळणार?