आमदारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला पाहिजे यावर तोडगा निघेल- अंबादास दानवे

| Updated on: Jun 22, 2022 | 11:44 AM

हे लोक शिवसैनिक म्हणतात तर मग पक्षाप्रमुखाचा आदेश का मनात नाहीत या सगळ्या आमदारांनी कुटुंब प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे यावर तोडगा निघेल.

आम्ही सगळे शिवसेनेसोबत (Shivsena) आहोत आणि जे कुणी शिवसेना सोडायचा विचार करत आहेत त्यांच्याही विरोधात आम्ही आहोत. ही जनता शिवसेनेसोबत आहेत. जे लोक बाहेर गेले आहेत त्यांनी जनतेची ही भावना बघावी. ही तीव्रता हा रोष कुणाच्या विरोधात नाही पण आमचा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास आहे असं वक्तव्य आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी केलंय. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, उधवजींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, शिवसेनेच्या विचारला अपेक्षित मी काम करणार, जनतेने या सगळ्या लोकांना निवडून दिलं आहे, हे लोक शिवसैनिक (Shivsainik) म्हणतात तर मग पक्षाप्रमुखाचा आदेश का मनात नाहीत या सगळ्या आमदारांनी कुटुंब प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे यावर तोडगा निघेल.एकनाथ शिंदे सांगत असलेला आकडा त्यांच्याकडे नाही, बरेचसे आमदार शिवसेनेसोबत आहेत असंही ते म्हणालेत.

 

 

 

Published on: Jun 22, 2022 11:44 AM
मुख्यमंत्र्यांच्या एकतर्फी कार्यक्रमाला कंटाळून आमदारांचा हा निर्णय- गिरीश महाजन
भाजपकडून संख्याबळाची तपासणी सुरु, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा