कसं होणार काय होणार याबाबत चर्चा होईल- हसन मुश्रीफ

| Updated on: Jun 22, 2022 | 1:45 PM

चर्चा होईल काय होणार कसं होणार याबाबत चर्चा घेतली जाईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.

मुंबई:  देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही बड्या नेत्यांचं या सगळ्या घटनांकडे बारीक लक्ष आहे. कालपासून या सगळ्या घडामोडी सुरु असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याची चर्चा होती. दरम्यान राजकारणात (Politics) सुरु असलेल्या भूकंपाचे हादरे सगळ्याच पक्षातील सगळ्याच लोकांना बसलेत. या राजकीय घडामोडींवर सगळेच नेते आपलं मत व्यक्त करतायत. काहींना याबाबत कल्पना आहे तर काहींना काहीच कल्पना नाही. राष्ट्रवादीने (National Congress Party) आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईत दाखल व्हायचे आदेश दिलेत.दरम्यान हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.आम्हाला काहीही सूचित करण्यात आलेलं नाही. चर्चा होईल काय होणार कसं होणार याबाबत चर्चा घेतली जाईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. जे काही होईल ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान होईल असं त्यांनी यावेळी सांगितलंय.

 

 

Published on: Jun 22, 2022 01:45 PM
उरलेली शिवसेना रस्त्यावर! महिला पदाधिकारी रडल्या…
VIDEO : Shivsena Political Crisis । सचिन अहिर हॉटेल मधील शिवसेना आमदारांना भेटून संवाद साधत आहेत