Eknath shinde vs shiv senan : आमदार अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं, मोठं खंडपीठ स्थापन करावं-सुप्रीम कोर्ट
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही निर्णय कोर्टानं दिला आहे. 1 ऑगस्टला पुढची सुनावणी पार पडणार आहे. तर कागदपत्रं सादर करण्यासाठी त्यांना 27 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आलाय.
नवी दिल्ली : शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडलं आणि राज्यात शिंदे सरकार (Eknath Shinde) आलं मात्र या सरकार विरोधात तसेच 16 आमदारांविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. तसेच एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल चार याचिका दाखल केल्या. या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांकडून घमासान युक्तीवाद झाला. शिंदे यांची बाजू हरीश साळवे यांनी लढवली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते. जोरदार युक्तिवादानंतर कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागितली त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला वेळ देत पुढची तारीख दिली आहे. तसचे वेळ वाढवून हरीश साळवे यांनीही मागितली होती. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ही निर्णय कोर्टानं दिला आहे. 1 ऑगस्टला पुढची सुनावणी पार पडणार आहे. तर कागदपत्रं सादर करण्यासाठी त्यांना 27 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आलाय.