लिहून ठेवा… ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा तडीपार…, मविआच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ
'४ जूननंतर याला उत्तर दिलं जाईल. स्वतः राज्याचा जो मुख्यमंत्री आहे, तो तडीपार होईल असे त्याच्यावर गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी असे त्यांचे अपराध आहे, असे त्यांचे गुन्हे आहेत.', सुधाकर बडगुजर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून कुणी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात
सुधाकर बडगुजर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ‘सगळे गुंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाबरोबर फिरताय. मुख्यमंत्र्यांबरोबर फिरताय. नगर शहरात गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करतात. ४ जूननंतर याला उत्तर दिलं जाईल. स्वतः राज्याचा जो मुख्यमंत्री आहे, तो तडीपार होईल असे त्याच्यावर गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची टोळी असे त्यांचे अपराध आहे, असे त्यांचे गुन्हे आहेत. एकतर ते तुरूंगात जातील किंवा तडीपार होतील.. लिहून ठेवा माझं वाक्य…’, असं भाकितच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल केलं.
Published on: May 09, 2024 01:22 PM