VIDEO : Eknath Shinde LIVE | राणेंच्या यात्रेचा शिवसेनेला फरक पडणार नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad yatra) सुरु झाली आहे. आज नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मुंबईत आजपासून जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad yatra) सुरु झाली आहे. आज नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याची माहिती आहे. राणेंना आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कालपर्यंत सेना नेत्यांनी घेतली होती. मात्र आज सेना आमदार सदा सरवणकर यांनी यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाण्यापासून आम्ही रोखणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता त्यानंतर नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, राणेंच्या यात्रेचा शिवसेनेला फरक पडणार नाही, असे शिंदे म्हणाले.