एकनाथ शिंदेंचा पोलीस ताफा पुन्हा ठाण्यातील घरी परतला
एकनाथ शिंदेंचा पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे. शिंदे सूरतला जाताना त्यांच्यासोबत पोलिसांचा ताफा होता. ते गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा ताफा ठाण्यात परतला आहे.
एकनाथ शिंदेंचा पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे. शिंदे सूरतला जाताना त्यांच्यासोबत पोलिसांचा ताफा होता. ते गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा ताफा ठाण्यात परतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरली. शिंदेंनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट त्यांनी घातली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. सोमवारी रात्रीच हालचाली झाल्या आणि एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांसह सूरतला रवाना झाले. मंगळवारी रात्री ते सूरतहून गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेला पोलीस ताफा ठाण्यात परतला.
Published on: Jun 22, 2022 03:20 PM