Shiv Sena : राज्यात लवकरच सत्तांतर, राऊतांचा दावा; त्यांना स्वप्न रंगवू द्या, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Jul 28, 2022 | 1:47 PM

महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावाही राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. या गटानं फुटून महाराष्ट्राला काय दिलं. त्यांना दुसऱ्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावाही राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावलाय. ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या’, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी राऊतांना दिलंय.

 

Published on: Jul 28, 2022 01:47 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 July 2022
CM Eknath Shinde : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती; राज्याचं काम थांबू दिलं नसल्याचाही दावा