राष्ट्रवादी हातून निसटली अन् शरद पवार यांना धक्का, निवडणूक आयोगाचा फैसला दादांच्या बाजूनं
अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालाय. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा फैसला अजित पवार गटाच्या बाजूनं दिलाय.
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला. अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळालाय. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा फैसला अजित पवार गटाच्या बाजूनं दिलाय. त्यामुळे पक्ष शरद पवार यांच्या हातून निसटला आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय. अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधीमंडळात जास्त संख्याबळ आहे. प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह देण्यात येते. अजित पवार गटाकडे ४१ आमदारांचं तर शरद पवार गटाकडून १५ आमदारांचं प्रतिज्ञापत्र सादर, ५ आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूनं प्रतिज्ञापत्र दिलं होतं..बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट