अजित पवार राष्ट्रवादीचे ‘दादा’, निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवार यांना धक्का
निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दरम्यान, शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवीन नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.