लोकसभेच्या घोषणेआधी निवडणूक आयोगाकडून राजकीय नेत्यांच्या फोटोसंदर्भातील गाईडलाईन्स जारी

| Updated on: Mar 06, 2024 | 3:01 PM

राजकीय नेत्यांचे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार, प्रशासकीय विभागांच्या वेबसाईटवरून नेत्यांना फोटो हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई, ६ मार्च २०२४ : येत्या काहीच दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. अगदी कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच राजकीय नेत्यांचे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे राजकीय नेत्यांना आपले फोटो प्रसिद्ध करता येणार नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात येणाऱ्या आचारसंहितेच्या काळात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत वेबसाईटवरून राजकीय नेत्यांना आपले फोटो काढून टाकावे लागणार आहे. यासंदर्भातील आदेशच केंद्रीय निवडणूक आयोगाने देताना प्रशासकीय विभागांच्या वेबसाईटवरून नेत्यांना फोटो हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published on: Mar 06, 2024 03:01 PM
उबाठाच्या ‘त्या’ पोपटांनी संपत चाललेल्या पक्षाची चिंता करावी आणि…, राऊतांवर कुणाचा रोख?
‘प्रत्येक महाराष्ट्र सैनिक…’, राज ठाकरे यांनी स्वतःच्या हातानं लहानसं पत्र लिहून पदाधिकाऱ्यांना केलं आवाहन