ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस, प्रकरण काय?
ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांकडून परस्परविरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार...
धाराशिव मतदारसंघामधून एक मोठी बातमी समोर येतेय. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांकडून परस्परविरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर केलाय. तर ओमराजे निंबाळकर यांचा तेरणा हॉस्पिटलबाबातचा आरोप चुकीचा असल्याची तक्रार अर्चना पाटलांकडून करण्यात आलीये. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमध्ये दोघांनाही पुरावे देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासह जर पुरावे दिले नाही तर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आलाय.