शिवसेना, धनुष्यबाणावर आज फैसला; यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक बातम्यांचे अपडेट्स
शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर दाखल करण्यात येणार आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत असून ५ मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने दोन दिवस पाणी कपात असणार आहे.
सावित्रीबाई घरोघरी दिसतात पण चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबांचा शोध जारी असल्याचे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं असून त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुकाराम महाराजांना बायको रोज मारहाण करत होती, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून नवा वाद, तर माफी मागा अन्यथा आंदोलन करून गुन्हा दाखल करू, असा इशारा तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज प्रशांत महाराज यांनी दिला आहे.