आधी मोदी- शाहांवर कारवाई करा मग आमच्यावर, आयोगाच्या ‘त्या’ नोटीसवर उद्धव ठाकरेंचा निशाणा
मशाल या गीतात जय भवानी हा शब्द काढण्यात यावा, असे निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तर मशाल या गीतात जय भवानी हा शब्द काढणार नाही, या उलट न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यासोबत उद्धव ठाकरे असंही म्हणाले की....
ठाकरे गटाच्या मशाल गीतावरून निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला नोटीस पाठवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने ही नोटीस ठाकरे गटाला पाठवली आहे. मशाल या गीतात जय भवानी हा शब्द काढण्यात यावा, असे निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तर मशाल या गीतात जय भवानी हा शब्द काढणार नाही, या उलट न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यासोबत उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे देवाच्या नावाने मतं मागतात त्यावेळी कारवाई का केली जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर कारवाई करा मग आमच्यावर कारवाई करा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे निवडणूक आयोगाला आव्हानच दिलं आहे.
Published on: Apr 21, 2024 06:15 PM