‘घड्याळाचे बटण दाबणार…’,अजितदादांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात; निवडणूक आयोगाचा आक्षेप
आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार, अशा आशयाची ही जाहीरात आहे. मात्र, या जाहिरातील एका दृष्यावर राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका टेलिव्हिजनवरील जाहीरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार, अशा आशयाची ही जाहीरात आहे. मात्र, या जाहिरातील एका दृष्यावर राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेल्या जाहीरातीत दाखवल्याप्रमाणे एक पत्नी आपल्या पतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या योजनांची माहिती देते. शेवटी ही पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, “आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या. नाहीतर, आज रात्री मी तुम्हाला खायला घालणार नाही.” एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर, राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडीओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे.