मतांच्या टक्क्यात अचानक वाढ, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ७६ लाख मतदान कसं झालं? जे आजवर कधीही घडलं नाही ते महाराष्ट्रात कसं घडलं? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आलाय. दरम्यान, ईव्हीएम बरोबरच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संध्याकाळी ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ७६ लाख मतदान कसं झालं? असा सवाल करत निकालाला पाच दिवस होऊनही निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन शंकेचं निरसन का केलं नाही? असा सवालही केलाय. अशातच मतदानाची वाढ ही सामान्य असल्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी अचानक झालेल्या मतांच्या टक्केवारीवरून निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी महाराष्ट्रात एक लाखांहून अधित मतदान केंद्र होती. मतांमध्ये पोस्टल मतपत्रिकादेखील जोडल्या जातात, असं म्हणत मतदानाची वाढ ही पूर्णपणे सामान्य असल्याचे निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटले आहे.