Worli | वरळीत ललित अंबिका इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी
वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे.
वरळीच्या हनुमान गल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ललित अंबिका असं या इमारतीचं नाव आहे. बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर ही इमारत आहे. या इमारतीचं अद्याप काम सुरु आहे. मृतांमध्ये अविनाश दास (35 वर्षे), भारत मंडल (27 वर्षे), चिन्मय मंडल (33 वर्षे) आणि एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लक्ष्मण मंडल (35 वर्षे) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.