मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर जात असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड अन् केलं इमर्जन्सी लँडिंग
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. अशातच महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे दौऱ्यावर जात होते. यावेळी ही घटना घडली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱा अचानक रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील राजभवन येथून ते सातारा पाटण येथे दौऱ्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Published on: May 13, 2023 11:21 AM