Pune Protest : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आक्रमक; का उतरले रस्त्यावर?
VIDEO | पुणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी वर्गाचं आंदोलन; कर्मचाऱ्यांचा रोष अनावर, 'या' प्रकरणी व्यक्त केला निषेध
पुणे : पुणे शहरात अतिक्रमणाचा विषय चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यांनी भाईगिरी केल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे महानगरपालिकेत आंदोलनाचं हत्यारं उपण्यास आलंय. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच आंदोलन आज सकाळपासून सुरू आहे. अतिक्रमण विभागाचा कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात पुणे महापालिकेच्या समोर अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच हे आंदोलन सुरू असून निषेध सभा घेत मारहाणीचा करत आहेत पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा विरोध दर्शविला आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना अधिकाऱ्यांनी गुंडागर्दी आणि मारहाण केल्याची माहिती मिळत असून त्याचे व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची दबंगगिरी दिसत आहे. तर एका ठिकाणी पोलिसांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. या घटनेत युवक काँग्रेसने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.