Akola | राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही संप
अकोला जिल्हा सह राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करून सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता बेमुदत राज्यव्यापी संप सुरू झाला असून या संपात मुर्तीजापुर आगारातील सर्व कर्मचारी,वाहक चालक,कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहे.
अकोला जिल्हा सह राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करून सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता बेमुदत राज्यव्यापी संप सुरू झाला असून या संपात मुर्तीजापुर आगारातील सर्व कर्मचारी,वाहक चालक,कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहे….त्यामुळे मुर्तीजापुर आगारातून धावणाऱ्या सर्व मार्गावरील बसेस बंद झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.एसटी महामंडळाची अवस्था बिकट असून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन तसेच इतर सुविधा मिळत नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली देण्यात आली तुमचे बलिदान वाया जाणार नाही अशा घोषणा देखील देण्यात आल्या.राज्यव्यापी संपात मूर्तिजापूर येथील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून आगाराच्या समोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून,सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एस टी चे महाराष्ट्र राज्य शासनाचे विलगीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी-सवलती वेतन व भत्ते त्वरित लागू करण्यात यावी अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.