झाडं म्हणतंय, QR कोड स्कॅन करा आणि जाणून घ्या माझ्याबद्दल सर्व काही, कुठे घडतंय हे असं?
पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये 850 वृक्षांना क्यूआर कोड लावण्यात आला असून या क्यूआर कोडच्या माध्यमातून एका क्लिकवर झाडंचं सांगणार स्वतःची माहिती
पुण्यातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक गार्डन म्हणून ओळख असणारे गार्डन म्हणजे एम्प्रेस गार्डन. हे एम्प्रेस गार्डन आता डिजिटल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या गार्डनमध्ये आता झाडेच स्वतःची माहिती आणि इतिहास सांगणार आहे.
पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये 850 वृक्षांना क्यूआर कोड लावण्यात आला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून एका क्लिकवर झाडंचं स्वतःची माहिती देणार आहेत. गार्डन मध्ये आलेल्या प्रत्येकाला फक्त झाडावरील क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. ज्या झाडावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन केला जाईल, त्या झाडाची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे.
एम्प्रेस गार्डन पुण्यातील सर्वात जुने गार्डन असून त्या ठिकाणी 200 वर्षाहून अधिक जुने वृक्ष आजही उभी आहेत. एम्प्रेस गार्डनमध्ये अतिशय दुर्मिळ वृक्ष आणि वेली आजही तितक्याच दिमाखाने उभी आहेत. हे गार्डन डिजिटल बनवण्यासाठी सहा महिन्यांची मेहनत असल्याचे सांगितले जात आहे. तर या गार्डनला ग्रीन हेरिटेज घोषित करण्याचे मागणी देखील आता करण्यात येत आहे.