VIDEO : Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक
एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली.
एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.