… तर संजय शिरसाट यांना मंत्रालयात प्रवेश का? ‘या’ भाजप आमदारांनी काय केला सवाल?
VIDEO | मुंबईतील मंत्रालय प्रवेशद्वारावर वेगवेगळे नियम कशासाठी? मंत्रालयातील प्रवेशद्वारावर झालेल्या कालच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांच्या मंत्रालय प्रवेशाच्या प्रकारानंतर भाजपच्या कोणत्या आमदारांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब?
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | मंत्रालय प्रवेशद्वारावर वेगवेगळे नियम आहेत का? असा सवाल भाजपच्या काही आमदारांनी केला आहे. भाजप आमदार राहूल कुल, जयकुमार गोरे आणि संजय कुटे यांनी असा सवाल अधिकाऱ्यांना केलाय. मंत्रालयातील प्रवेशद्वारावर झालेल्या कालच्या संजय शिरसाट यांच्या प्रवेशाच्या प्रकारानंतर या आमदारांनी हा सवाल करत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. मंत्रालयातील मुख्यगेटवर प्रवेश बंद मग संजय शिरसाट यांना प्रवेश का? असा थेट सवालच या आमदारांनी केलाय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट काल कामानिमित्त मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते. नवीन नियमानुसार आमदाराच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेश नसल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी गाडी रोखली मात्र संतापलेल्या शिरसाट यांनी त्यांची गाडी गेटवरच उभी केली. यानंतर काहिसा वाद घालून संजय शिरसाट यांनी वाद घालून मंत्रालयात प्रवेश केला होता.