Nitin Gadkari | आर्थिक परिस्थितीतही जगात एक नंबरला ‘महाराष्ट्र’ गेला पाहिजे – नितीन गडकरी

| Updated on: Sep 24, 2021 | 3:27 PM

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रज येथे 2215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यातील या कामांचा विकास नहाय आणि महाराष्ट्र राज्याच्या पीडब्ल्यूडी यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. ईपीसी आणि बीओटी तत्त्वावर महामार्गांचा विकास करण्यात येणार आहे. पुण्याला मुंबई, रायगड, सातारा, सोलापूर, अहमदगर, नाशिक जोडणाऱ्या रस्त्यांचा याद्वारे विकास करण्यात येत आहे.

नहाय आणि पीडब्ल्यूडी महाराष्ट्र विभागाच्या वतीनं तायर करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 डी शिक्रापूर न्हावरा सेक्शनचं काम पूर्ण झालं आहे. 46.46 कोटी रुपयांच्या 28 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरकीरणाचं काम पूर्ण झालं आहे. शिक्रापूर आणि न्हावरा या दोन्ही क्षेत्रातील एमआयडीसी जोडल्या जातील आणि अहमदनगर आणि मराठवाड्याची कनेक्टविटी वाढणार आहे.