राज्यभरातील मंदिर समित्यांनी कपड्याबाबत घेतलेल्या निर्णयावर नितेश राणे म्हणाले, ‘हिजाब घालण्यावर…’

| Updated on: May 30, 2023 | 4:07 PM

VIDEO | राज्यभरातील मंदिर समित्यांनी कपड्याबाबत घेतलेल्या निर्णयाचं नितेश राणे यांच्याकडून स्वागत, काय म्हणाले...

सिंधुदुर्ग : राज्यभरातील मंदिर समित्यांनी कपड्याबाबत घेतलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंदिर समित्यांनी घेतलेल्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे नितेश राणेंकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक हिंदूंनी आपल्या मंदिरात नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं. पुढे नितेश राणे असेही म्हणाले, राज्यभरातल्या मंदिर समित्यांनी पुढाकार घेऊन मंदिरामध्ये कपड्यांच्या आचारसंहितेबद्दल जो काय निर्णय घेतला आहे तो निश्चित पद्धतीने स्वागतार्ह्य आहे. हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. ज्या अर्थी हिजाब घालण्यावर त्या त्या धर्माचे लोकं अतिशय कडक भूमिका घेतात. कुठलंही तडजोड करत नाही. त्याचपद्धतीने प्रत्येक हिंदूने आपण आपल्या मंदिरामध्ये आचारसंहिता पाळावी आणि त्याबद्दल काही तडजोड करता कामा नये, असे आवाहनही त्यांनी समस्त हिंदू वर्गाला केले.

Published on: May 30, 2023 04:07 PM
डांबरी रस्ता आहे की चादर? म्हणे जर्मन तंत्रज्ञान!; नवीन रस्ता हातानं उचलला, कुठं समोर आला हा प्रकार?
ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये बिनसलं? अरविंद सावंत म्हणतात…