Buldana | बुलढाणा जिल्ह्यात टायगर नावाच्या बोकडाची सर्वत्र चर्चा
टायगवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे. ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः "अल्लाह" उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की, ज्यांच्याकडे अशी जनावरे आढळतात त्यांना नशिबवान मानलं जातं.
बुलढाणा : जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात सध्या लाखोंची बोली यावर लावली जातेय. टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत. टायगवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे. ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः “अल्लाह” उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की, ज्यांच्याकडे अशी जनावरे आढळतात त्यांना नशिबवान मानलं जातं.