मारकडवाडीचा मुद्दा महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही सत्ताधारी-विरोधकांमध्ये रंगले सवाल-जवाब
मारकडवाडीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये सवाल जवाब रंगले. एकीकडे महाराष्ट्राच्या सभागृहात चर्चा होत असताना दुसरीकडे दिल्लीत शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांनी पवारांच्या निवासस्थानी बैठक घेत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
ईव्हीएमवरून चर्चेत आलेल्या मारकडवाडीचा मुद्दा महाराष्ट्रासोबतच आता दिल्लीतही चर्चेत राहिला. इतकंच नाहीतर विधानसभेतील सभागृहातही गाजला. मारकडवाडीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये सवाल जवाब रंगले. एकीकडे महाराष्ट्राच्या सभागृहात चर्चा होत असताना दुसरीकडे दिल्लीत शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांनी पवारांच्या निवासस्थानी बैठक घेत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. माहितीनुसार विजयी झालेले शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून बॅलेट पेपरवर फेरमतदानाची मागणी करणार आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र लिहित थेट तीन प्रश्न केलेत. महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर जास्तीचे मतदान झाले. या आकडेवारीवरून चिंता व्यक्त करत एका मतदानासाठी किती वेळ लागतो? संध्याकाळी ५ नंतर झालेल्या मतांची नोंद आयोगाकडे आहे का? असल्यास तपशील द्यावा. आणि ६ वाजेनंतर मतदानासाठी रांगेत असलेल्या लोकांना टोकन दिलं होतं का? त्याचे तपशील द्यावे, असे सवाल आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला केलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट