Exclusive : नरहरी झिरवळ यांनी सांगितला जपान दौऱ्याचा अनुभव, स्वेटर घ्यायला गेलो पण किंमत ऐकून म्हणालो…
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ जपान दौऱ्यावरुन परतले आहेत. यावेळी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जपान दौऱ्यातील अनेक अनुभव सांगितले.
मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ जपान दौऱ्यावरुन परतले आहेत. काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी यांचा फोटो व्हायरल झाला होता. टीव्ही ९ मराठी सोबत बोलत असताना त्यांनी जपान दौऱ्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, ‘मी माझ्या मतदारसंघातील सर्वाचे आभार व्यक्त करतो. कारण माझ्या पिढ्यांमध्ये कुणीही मुंबई पाहिली नव्हती. माझ्या पूर्वजांच्या लाईफमधला क्षण पाहायला मिळाला. विधीमंडळाच्या बैठकीत मी सांगितलं होतं की मी कपडे बदलणार नाही. जे कपडे आहेत तसा राहणार. माझी अडचण होणार नाही. आम्ही शेतात काम करणारे आहोत. पत्नीचा आगळावेगळा प्रवास होता. मी माझा पेहराव घालून तिकडे गेलो होतो. माझा आणि पत्नीचा फोटो व्हायरलं झाला. 10 तास विमानात बसायला मिळालं. एका वेगळा जगात आल्याचा अनुभव आला.’
‘जपानचा विचार केला तर आपण 25 ते 30 वर्षे पाठी आहोत. आपल्याकडे प्रत्येक माणसाची मानसिकता फिक्स झालेली आहे. प्रत्येकानं स्वता:ला शिस्त लावून घेतलेली नाही. जपानचा माणूस शिस्त पाळतो. गाडी नसताना सिग्नल रेड असेल तरच ते पुढे जातील. नव्वद वर्षाचा माणूस सिग्नल पर्यंत येतो.’
‘मोटार सायकल जपानमध्ये दिसली नाही. हाँर्न बिलकूल वाजवला जात नाही. प्रदूषण हा विषय़ तिकडे मोठ्या प्रमाणानं तपासला जातो. गाडीचा आवाज नाही धुर नाही. जपानची झाड ही निसर्गाची खूप मोठी देणगी आहे. जंगला विषयी आदर आहेत. जपानमध्ये शिस्त पाळली जाते. जपानमधला माणूस 95 वय जगतो. आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेण्याची गरज आहे. जपानमध्ये नोकरीची संधी आहे. भारतीय जपानमध्ये जाँबला आहेत.’
‘दोन दिवस धोतर घातलं. नाशिकच्या थंडीत पत्नी काम करते. त्यामुळे तिला थंडीचं एवढं काही नव्हतं पण आग्रहामुळे दुकानात स्वेटर घ्यायला गेलो.’ पत्तीला स्वेटरची किंमत सांगितली 28 हजार. 1200 रूपयाचं स्वेटर नाशिकला मिळेलं. अनेकांना स्वेटर घेवू शकतो. चार नातवंडासाठी एवढे खेळने घेवून टाकले. कार्यकर्त्यांना 5 ते पन्नास बुलेट ट्रेनचा अनुभव खूपचं चांगला आहे. जे तिकडे आहेत ते इकडे आहे पण आपल्याकडे बुलेट ट्रेनमध्ये स्वच्छता चांगली आहे. बुलेट ट्रेन आपल्याकडे आली तर तितकी स्वच्छता राहील का?’