Cruises Drug Case | कॉर्डिला क्रूजवरील ड्रग्ज पार्टीचा Exclusive व्हिडीओ
मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केलं. या अटकेनंतर बॉलिवूड विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता क्रूझवर झालेल्या या पार्टीचे काही इनसाईड फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केलं. या अटकेनंतर बॉलिवूड विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता क्रूझवर झालेल्या या पार्टीचे काही इनसाईड फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. याच पार्टीतून आर्यन खानला NCBने अटक केली आणि त्याच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे. या सर्व फोटोमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर मारून अनेकजण एकच ठिकणी जमा झालेले दिसून येतं आहे. या पार्टीमध्ये अनेक जण धुम्रपान,आणि दारू पिताना देखील दिसतं आहेत. या पार्टीमध्ये डोळ्यांना दिपणारी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तेथे जमा असलेले लोक बेधंद होऊन गाण्यावरती नाचत असल्याचेही दिसून येत आहे.