पुण्यात 250 जातींच्या गुलाबांचं प्रदर्शन, प्रदर्शनाचं 105 वे वर्ष
यावर्षी या प्रदर्शनाचं 105 वं वर्ष होतं. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. या गुलाब प्रदर्शनाचा पुणेकरांनी आनंद लुटला. विविध प्रजातींचे गुलाब यावेळी पाहायला मिळाले.
पुणे : प्रत्येक माणसाला गुलाबाचं खास आकर्षण आहे. विविध प्रकारच्या गुलाबांना समारंभात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. काही ठिकाणी गुलाबाची शेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र एकाच ठिकाणी तुम्हाला 250 प्रकारचे गुलाब पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. पुण्यातील द रोझ सोसयटीतर्फे पुण्यात दरवर्षी या गुलाब प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. यावर्षी या प्रदर्शनाचं 105 वं वर्ष होतं. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. या गुलाब प्रदर्शनाचा पुणेकरांनी आनंद लुटला. विविध प्रजातींचे गुलाब यावेळी पाहायला मिळाले.