Expansion Of Maharashtra Cabinet : लोकसभेत दारूण पराभव अन् डॅमेज कंट्रोलसाठी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला मिळणार संधी?
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी झालेत. त्यामुळे आता भुमरे खासदार होत असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देतील. मात्र राज्यात मंत्रिपद डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केला जाऊ शकतो.
देशापाठोपाठ आता महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काहीच दिवसात राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील अंदाज आहे. दरम्यान, केंद्रात मोठ्या हालचाली सुरू असताना राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल केली जाण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे विजयी झालेत. त्यामुळे आता भुमरे खासदार होत असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देतील. मात्र राज्यात मंत्रिपद डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केला जाऊ शकतो. एकनाथ शिंदेंनी शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार तिनदा झाला आहे. मात्र एक मंत्रिमंडळ विस्तार केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील मंत्र्यांना संधी देण्यासाठी झाला त्यावेळी शिवसेनेतील अनेकांना मंत्रिपद मिळाले नाही. पंरतू, आता शेवटच्या सहा महिन्यांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळते, याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले आहे.